'तिहार' सुरक्षित; मल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य?

Tihar Jail is safe Vijay Mallyas Extradition Possible
Tihar Jail is safe Vijay Mallyas Extradition Possible

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मल्ल्याचे भारतात लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. 

भारतातील कारागृह माझ्यासाठी असुरक्षित असल्याचे विजय मल्ल्याने यापूर्वी म्हटले होते. लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डिंगेमॅन्स आणि न्यायाधीश लेगाट यांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. तिहार जेलमध्ये असलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक संजीव चावला यांच्या जीवाला भारतात कोणताही धोका नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भारताकडून चावलाच्या उपचारांसाठी भरवसा मिळाल्यानंतर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. 

दरम्यान, भारतातील कारागृह हे असुरक्षित असल्याचा दावा याआधी विजय माल्ल्याने अनेकदा केला असून, भारतात परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच या निर्णयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com