'त्या' लेस्बियन कपलचा TikTok ने केला व्हिडिओ डिलीट, कारण...

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

टिक-टॉकने हा व्हिडिओ डिलीट केला आहे. कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन करण्यात आल्याने असे करण्यात आल्याचे कारण दिले आहे. मग, जे होमोफोबियाविषयी बोलले जाते ते खरे आहे. टिक-टॉकने याबाबत उत्तर द्यावे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधल्या लेस्बियन असलेल्या त्या दोघींचे फोटोशूट नुकतेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता त्या दोघींनी टिक-टॉकवर टाकलेला व्हिडिओ मात्र डिलीट करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाची असलेली अंजली चक्रा आणि पाकिस्तानी असलेल्या सुंदास मलिक या लेस्बियन कपलने विवाह केला होता. न्यूयॉर्कमधील त्यांचे फोटोशूट व्हायरल झाले होते. आता त्यांनी टिक-टॉकवर त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पण, तो व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याचे अंजलीने ट्विट करत सांगितले आहे. अंजलीने 1 डिसेंबरला हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्याला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 14 हजार लाईक्स मिळाले होते. डान्स मुव्ह दरम्यान त्यांचे ड्रेस बदलले जातात एवढेच या व्हिडिओमध्ये आहे. 

अंजलीने म्हटले आहे, की टिक-टॉकने हा व्हिडिओ डिलीट केला आहे. कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन करण्यात आल्याने असे करण्यात आल्याचे कारण दिले आहे. मग, जे होमोफोबियाविषयी बोलले जाते ते खरे आहे. टिक-टॉकने याबाबत उत्तर द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tik-Tok delete indian pakistani lesbian couple video