'टिक टॉक'चे दररोज तब्बल साडेचार कोटींचे नुकसान

TIKTOK
TIKTOK

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने 'टिक टॉक' अॅपवर बंदी घ्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून या संदर्भात 24 एप्रिलला सुनावणी घ्यावी किंवा हे प्रकरण निकाली काढावी असा आदेश दिला आहे. या बंदीमुळे कंपनीचे दररोज साडेचार कोटींचे नुकसान होत असल्याची बाजू टिकटॉक कंपनीने मांडली आहे. 

टिकटॉकच्या आहारी तरूणाई जात आहे, तर या अॅपचा गैरवापार होत आहे, त्यामुळे या अॅपवर बंदी घालावी अशी मागणी मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली होती. या नंतर मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवर बंदी घातली होती. तसेच गुगल प्ले स्टोअर व अॅपलमधून हे अॅप काढून टाकावे असा आदेश कंपन्यांना दिला होती. 

आजच्या (ता. 22) सुनावणीत टिक टॉक कंपनीने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यांनी सांगितले की आमची बाजू ऐकून न घेताच या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे, आमचे दररोज साडेचार कोटींचे नुकसान होत आहे, तर 2 मिलियन युजर्सची अकाऊंट्स व सुरक्षाही पणाला लागली आहे. हे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने या अॅपवरील बंदी तात्पुरती उठवली आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com