Video: भाजपच्या पराभूत उमेदवाराची दर्दभरी गाणी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार व टिकटॉक क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर त्यांनी टिकटॉकवर दर्दभरी गाण्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार व टिकटॉक क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर त्यांनी टिकटॉकवर दर्दभरी गाण्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

आदमपूर विधानसभा मतदारसंघातील निकाल लागल्यानंतर सोनाली फोगट यांचे टिकटॉकवर दर्दभऱ्या गाण्यांवरचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. भाजपने उमेदवारी दिल्यानंतर सोनाली यांनी म्हटले होते की, 'माझे सर्व फॉलोअर्स मला पाठिंबा देतील. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ते वाट बघत आहेत. पक्षाने मला संधी दिली असून, मला खात्री आहे की मी निवडणूक जिंकेन.' भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. परंतु, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सोनाली फोगट टिकटॉक स्टार आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे. शिवाय, व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोनाली यांचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनाली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tik tok star sonali phogat crying video goes viral after lost in harayana assembly election 2019