भाजप बहुमतापासून दूर; युपीएला मिळणार 150 पेक्षा कमी जागा

भाजप बहुमतापासून दूर; युपीएला मिळणार 150 पेक्षा कमी जागा

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019च्या निकालासंदर्भात न्यूज चॅनल टाइम्स नाऊनं व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेतून भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहील भाजपप्रणित एनडीएला 250 पर्यंत जागा मिळतील तर युपीएला 150 पेक्षा कमी जागा मिळतील असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, अशी शक्यता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं केलेल्या सर्व्हेतून व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसला दक्षिण भारतात 2014च्या तुलनेत चौपट जागा (71) मिळतील, असाही अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

जानेवारीमध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून, या सर्वेक्षणातून वेगवेगळ्या राज्यांतील निकालासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तिथे आता निवडणुका झाल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मोठा फायदा पोहोचू शकतो. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला तामिळनाडूत खातंही उघडता येणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्यास भाजपचे खाते उघडू शकते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ 16 जागांवर विजय मिळवेल. कम्युनिस्टांना तीन जागा राखण्यात यश येईल. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. जर आज निवडणूक लागल्यास वायएसआर काँग्रेस 23 जागांवर विजय मिळवेल. तेलुगू देसम पार्टी फक्त 2 जागा जिंकेल. इथे भाजप आणि काँग्रेसला खातं उघडणंही अवघड असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com