कर्नाटकात भाजप सत्तेवर येताच टिपू सुलतान जयंती रद्दचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जयंती रद्द करण्यात आली आहे.

बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जयंती रद्द करण्यात आली आहे. यावर काँग्रेस आणि अल्पसंख्याकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

टिपू सुलतान जयंती सुरवातीला अल्पसंख्याक विभाग साजरे करत असे. 2013 मध्ये काँग्रेस व 2018 मध्ये काँग्रेस-जेडीयु युती सरकार सत्तेत आल्यानंतर कन्नड आणि सांस्कृतिक विभागाकडे जयंती साजरी करण्यास सुरु झाली. 2016 पासून आजतयागात कन्नड व सांस्कृतिक विभाग जयंती साजरी करते. पण, राज्यात सत्तांतर घडले. युती सरकारच्या जागी भाजपचे सरकार सत्तेत आले. बी. एस. येडियुराप्पा यांनी 19 जुलैला मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. सोमवारी बहुमत सिद्ध केले.

कोडगू जिल्ह्यात विराजपेठ विधानसभा मतदार संघातील आमदार के. जी. बोपय्या यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र दिले. त्यात त्यांनी टिपू सुलतान जयंती रद्दची मागणी केली. जयंतीला कोडगू जिल्ह्यात मोठा विरोध आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी होते. जयंती दरम्यान दोन गटात हाणामारी होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. द्वेषभावना तयार होते. त्यासाठी टिपू सुलतान जयंती साजरी केली जाऊ नये, अशी मागणी बोपय्या यांनी केली. त्याची गंभीर दखल घेत 29 जुलै रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय रद्द ठरविला असून, तसा आदेश आज कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या  सचिव पी. एस. मालती यांनी बजाविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tipu Sultan Jayanti order canceled as BJP comes to power in Karnataka