तिरुमलाचे दान म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर : काँग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिराला केलेल्या 5.6 कोटी रुपयांच्या दागिन्यांवरून काँग्रेसने राव यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दान म्हणजे करदात्या जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राव यांनी बालाजी आणि पद्मावती येथील मंदिरात 5.6 कोटींचे दागिने दान केले आहे. हे दान म्हणजे मंदिरासाठी सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामध्ये सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते मधु याशकी गौड म्हणाले, "हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. करदात्यांचे कोट्यवधी रुपये ते स्वत:ची मालमत्ता असल्यासारखे खर्च करत आहेत. हा प्रकार केवळ अनैतिक आणि घटनाबाह्य नसून हा कायदेशीर गुन्हा आहे. करदात्यांचा पैसा अशा दिखाऊपणासाठी खर्च करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही.' या प्रकरणी न्यायालयात दाद जाणार असल्याचेही गौड यांनी यावेळी सांगितले.

राव यांनी यापूर्वीही वारंगल येथील भद्रकालीला 3.65 कोटी रुपयांचे दान केले होते.

Web Title: Tirupati donation is misuse of Public Money : Congress