बालाजी मंदिरात 4 कोटींच्या जुन्या नोटांचे दान!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुदत संपल्यानंतर दहापेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगणे बेकायदेशीर ठरविणारा कायदाच केंद्र सरकारने केला आहे.

तिरुपती : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी तथा व्यंकटेश्वर मंदिराचे विश्वस्त पेचात पडले आहेत. कारण, नोटा बदलून घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत भक्तांनी तब्बल 4 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा देणग्यांमध्ये दिल्या आहेत. 
 
देवस्थानच्या वतीने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना याबाबत पत्र लिहिले असून, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा आहे, असे या मंदिराचे व्यवस्थापन करणारे तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी सांबशिव राव यांनी गुरुवारी सांगितले. 

मंदिराच्या आवारात ठेवलेल्या हुंड्यांमध्ये 30 डिसेंबरनंतर कालबाह्य झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा देणग्या म्हणून टाकण्यात आल्या आहेत. मुदत संपल्यानंतर दहापेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगणे बेकायदेशीर ठरविणारा कायदाच केंद्र सरकारने केला आहे. अशा नोटा बाळगणे दंडास पात्र ठरणारा गुन्हा आहे. त्याबद्दल 10 हजार रुपयांचा किमान दंड ठोठावण्यात येतो. 
 

Web Title: Tirupati temple got Rs 4 crore in old notes post demonetisation