'तितली' चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने 

पीटीआय
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

भुवनेश्‍वर (पीटीआय) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने "तितली' चक्रीवादळ निर्माण झाले असून, ते ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज सांगितले. ओडिशामध्ये बुधवारी (ता. 10) आणि गुरुवारी (ता. 11) मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देत "आयएमडी'ने "रेड अलर्ट'ही जारी केला आहे. 

'तितली' वादळ ओडिशा किनारपट्टीवरील गोपालपूरपासून बंगालच्या उपसागरामध्ये 530 कि.मी. अंतरावर आहे. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचा वेग वाढून ते बुधवारी ओडिशा आणि गुरुवारी आंध्रच्या किनारपट्टीला धडकू शकते,' असे हवामान विभागाने म्हटले आहे. आंध्र किनारपट्टीला स्पर्श केल्यानंतर हे वादळ पुन्हा उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: Titali Storm way of Odisha