हिंसा केल्याने भ्रष्टाचाराचा दोष मिटणार नाही : भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर मंगळवारी हल्ला केला. तर, आज एका भाजप नेत्याच्या निवासस्थानावर हल्ला केला. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या कृत्याचा निषेध करत हिंसा केल्याने भ्रष्टाचाराचा दोष मिटणार नसल्याची टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते सिद्धार्थ नाथ सिंह वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "तृणमूल काँग्रेसचे नेते विशेषत: निवडून आलेल्या सदस्यांना चिट-फंड कंपनीतील गैरव्यवहार प्रकरणात का अटक केली आहे याबाबत पक्षप्रमुखांनी विचार करावा. त्यांनी (ममता बॅनर्जी) या प्रकरणात हस्तक्षेप करावा. कारण त्या गरीब, दुर्बल आणि तळागाळातील लोकांचे नाव घेऊन निवडून आल्या आहेत. मात्र गरीबांना फसविण्यात येत असून चिट-फंड कंपन्यांमार्फत त्यांची लूट करण्यात येत आहे. या प्रकरणात त्यांचे पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी सहभगी आहेत.' बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर मंगळवारी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर आज तृणमूलच्या समर्थकांनी भाजप नेत्या कृष्णा भट्टाचार्य यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. या हल्ल्यात भट्टाचार किरकोळ जखमी झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिंह बोलत होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने मंगळवारी बंडोपाध्याय यांना ताब्यात घेतले. चिट फंड गैरव्यवहार प्रकरणात तृणमूलचे खासदार तापस पाल यापूर्वीच पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, बंडोपाध्याय यांनी आरोप फेटाळून लावत हा प्रकार म्हणजे आपल्याविरुद्ध आणि तृणमूलविरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: TMC leaders cannot be absolved of corruption charges through violence: BJP