तृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

नेहमीच गंभीर स्वभावात असलेल्या सौगत राय यांनी स्टेजवरच रवीना टंडनसोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी उपस्थितांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. या दोघांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

कोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेहमीच गंभीर स्वभावात असलेल्या सौगत राय यांनी स्टेजवरच रवीना टंडनसोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी उपस्थितांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. या दोघांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

रवीना टंडनच्या मोहरा या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे आहे. व्हिडिओमध्ये रवीना स्टेजवरील अन्य नागरिकांना नृत्यासाठी आग्रह करताना दिसत आहे. सौगत राय यांच्या नृत्याचे रवीनाने कौतुक केले. सौगत राय हे 71 वर्षांचे असून, ते मनमोहनसिंग सरकारच्या काळात राज्यमंत्री होते.

Web Title: TMC member of parliament Saugata Roy dance with Raveena Tondon