पैसे द्या अन्यथा खटला भरू 

Bank queue
Bank queue

कोलकता : तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीच्या विषयावरून केंद्र सरकारला घेरले असताना आता राज्याचे ग्राहक व्यवहारमंत्री सधन पांडे यांनी थेट बॅंकांनाच धमकी दिली आहे. बॅंका जर खातेधारकांना पैसे देणार नसतील, तर आम्ही त्यांच्यावर खटले भरू, असे पांडे यांनी म्हटले आहे. 'एटीएम'च्या रांगांमध्ये पैसे भरताना मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना आर्थिक नुकसानभरपाई दिली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने पुढाकार घेण्याची गरज असून, माझे खाते या संदर्भात बॅंकेला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. एखाद्या ग्राहकाने बॅंकेमध्ये पैसे भरल्यानंतर देखील ती बॅंक त्याला योग्य सुविधा देत नसेल, तर तिच्यावर खटला भरता येऊ शकतो, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आमच्याकडे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याचेही त्यांनी सांगितले. 

नोटाबंदीमुळे लोकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पंतप्रधानांनी या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 50 दिवसांचा अवधी मागितला होता; पण परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. 
- सधन पांडे, ग्राहक व्यवहारमंत्री, पश्‍चिम बंगाल 

'अच्छे दिन'पेक्षाही कॅशलेस इकॉनॉमी हे सर्वांत मोठे स्वप्न असून, याची किंमत सामान्य लोकांनाच मोजावी लागत आहे. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत आमच्याच पक्षाला यश मिळेल. 
- अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 

केरळमध्ये 51.86 लाख जप्त 
कन्नूर : येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 51.86 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली असून, जप्त केलेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बंगळूरमधून आलेल्या बसमधून ही रोकड जप्त करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील तीन दिवसांतील नोटा जप्त करण्याची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. रणजित सालानगी (वय 24) आणि राहुल अधिक ऊर्फ राहुल घट्टू (वय 22) यांच्या बॅगांमधून ही रक्कम जप्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com