'तृणमूल'चे खासदार पुन्हा राष्ट्रपतींना भेटले

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या तीस खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन मोदी सरकारने नोटाबंदीमुळे देशात "सुपर आणीबाणी' लागू केल्याची तक्रार केली. त्याचप्रमाणे या निर्णयाला विरोध केल्याबद्दल पक्षाच्या दोन खासदारांना अटक करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी तिसऱ्यांदा राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार डेरेक ओबेरन म्हणाले, ""देशात नोटाबंदीनंतर 120 जणांचा बळी गेला. त्याला पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत. अजूनही परिस्थिती बिकट असून राष्ट्रपतींनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती आम्ही केली.

पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीला ठाम विरोध केल्याने सुडाचे राजकारण केले जात आहे. रोझ व्हॅली चिट फंटप्रकरणी खासदार सुदिर बंडोपाध्याय आणि तपस पै यांना अटक केली आहे. भाजपच्या या हीन राजकारणाला पक्ष घाबरणार नाही.''

Web Title: tmc mp meets prez again