नुसरत जहाँच्या प्रकृतीत सुधारणा, रूग्णालयातून डिस्चार्ज

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कोलकाता शहरातील अपोलो रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आता त्यांची तब्येत बरी असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना अस्थमाचा त्रास आहे व असा त्रास त्यांना नेहमीच होतो.  

कोलकाता : बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना श्वासनाचा त्रास होत असल्याने काल (ता. 18) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कोलकाता शहरातील अपोलो रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आता त्यांची तब्येत बरी असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना अस्थमाचा त्रास आहे व असा त्रास त्यांना नेहमीच होतो.  

खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल, कारण...

शनिवारी त्यांनी पती निखील जैन वाढदिवसाची पार्टी केली होती. यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असल्याने त्या संसदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकल्या नाहीत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच हिंदू तरुणाशी लग्न करत संसदेत हजर झाल्याने त्या चर्चेत आली होती. नुसरत यांना अस्थम्याचा त्रास आहे. या आधीही त्यांना अनेकदा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. नुसरत जहाँ यांनी बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC MP Nusrat Jahan s Health Improves Released from Hospital