लोकसभा-विधानसभेत असाव्या महिलांसाठी एक तृतीयांश जागा; TMC मांडणार प्रस्ताव

west bengal cm mamata banerjee
west bengal cm mamata banerjee

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O’Brien) हे आज सोमवारी राज्य सभेमध्ये (Rajya Sabha) एक विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी प्रस्ताव मांडणार आहेत. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्याचे हे विधेयक असून तृणमूल काँग्रेस यासंदर्भात पुढाकार घेत प्रस्ताव मांडत आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून त्या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. (Trinamool Congress - TMC)

west bengal cm mamata banerjee
श्रीलंकेत पंतप्रधानांच्या मुलासह 26 मंत्र्यांचा राजीनामा

ओब्रायन हे नियम 168 अंतर्गत हा प्रस्ताव मांडणार आहेत. या नियमाअंतर्गत सदस्यांना सार्वजनिक हिताचे मुद्दे मांडता येतात. सध्या लोकसभेत 15% महिला खासदार आहेत तर राज्यसभेत 12.2% आहेत.

लोकसभेमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक विचारात घेण्यासाठी आणि पास करवून घेण्यासाठी पाठवणार आहेत. हे विधेयक आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स ऍक्ट, 1920 (Identification of Prisoners Act, 1920) रद्द करण्याचा प्रयत्न करते. या कायद्याअंतर्गत पोलिसांना बोटांचे ठसे, हस्तरेखा, पायाचे ठसे, छायाचित्रे, बुबुळ आणि डोळयातील पडद्याचे स्कॅन, जैविक नमुने, त्यांचे विश्लेषण, वर्तणूक गुणधर्म इत्यादी माहिती गोळा करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे.

west bengal cm mamata banerjee
ज्याच्या हत्येच्या आरोपाखाली होते अटकेत, तो होता जिवंत; सहा वर्षांनी दोघांची सुटका

दुसरीकडे राज्यसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चार्टर्ड अकाउंटंट ऍक्ट, 1949, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऍक्ट, 1959 आणि कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट, 1980 मध्ये सुधारणा करण्यासाठी एक विधेयक मांडणार आहेत. लोकसभेने दुरुस्त्या मंजूर केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com