तमिळनाडूच्या माजी मुख्य सचिवांचे निलंबन मागे

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

चेन्नई - तमिळनाडूचे सरकारने राज्याचे माजी मुख्य सचिव के. ज्ञानेदेसिकन आणि भूरचनाशास्त्र आणि खाण आयुक्त अतुल आनंद यांचे निलंबन मागे घेतले आहे.

वीजेसंदर्भातील कंत्राटे आणि करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप ठेवत ज्ञानदेसिकन यांना मागील वर्षी निलंबित करण्यात आले होते. तर अतुल आनंद यांच्यावर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या तस्करीशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. एका उच्चस्तरीय बैठकीनंतर तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी या दोन अधिकाऱ्यांने निलंबन केले होते.

या निलंबनाचा राज्यभरातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी निषेध केला होता. राज्य सरकारने आज (गुरुवार) या दोघांचेही निलंबन मागे घेतले आहे.

Web Title: TN Govt revokes suspension of bureaucrats