केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

अरविंद केजरीवाल आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार व 'हॅटट्रीक' करणार. अशातच अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे केजरीवालांसाठी आजचा दिवस एकदम खास आहे... का?  

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नवी दिल्ली : दिल्लीमधील विधानसभा निवडणूकांचे कौल बघता आम आदमी पक्ष बाजी मारणार हे नक्की. सकाळच्यी टप्प्यातील मतमोजणीत दिल्लीकरांनी आपला तब्बल ५१ जागांनी आघाडीवर ठेवलंय. तर भाजप १९ जागांच्या आजूबाजूला आहे. अरविंद केजरीवाल आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार व 'हॅटट्रीक' करणार. अशातच अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे केजरीवालांसाठी आजचा दिवस एकदम खास आहे... का?  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा बहुमत मिळवत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार बनत सुनिता यांना स्पेशल बर्थडे गिफ्ट दिलंय. आजचा योगायोग अगदीच स्पेशल आहे. आजच आपला भरघोस यश मिळतंय आणि सुनिताजींचा वाढदिवस आहे, त्यामुळे अरविंद केजरीवालांसाठी आजचा दिवस म्हणजे डबल सेलिब्रेशन आहे. 

सुनिता केजरीवाल या नेहमीच अरविंद यांच्या राजकीय वाटचालीत खंबीरपणे उभ्या असतात. याही निवडणूकीत रस्त्यावर उतरून, घरोघरी जात त्यांनी प्रचार केला होता. आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं व त्यांना वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट मिळालं आहे. सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.  

Image result for arvind kejriwal and sunita kejriwal

Delhi Elections:'आप'ची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने; पक्षाचं कार्यालय सजलं, जल्लोषाची तयारी

नवी दिल्ली मतदार संघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात सुनील कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच केजरीवाल यांना मोठी आघाडी मिळाली आहे. नवी दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्ष बहुमताकडे वाटचाल करत आहे. ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा 'हॅटट्रीक' करणार असे दिसते आहे. 

Delhi Elections:अच्छे होंगे पाँच साल, दिल्ली मे तो केजरीवाल!

Image result for arvind kejriwal and sunita kejriwal

सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 

Image result for arvind kejriwal and sunita kejriwal

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६१.४५ टक्के मतदान झाले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांचे कल हाती आले असून आप ५१ तर भाजपला १९ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने खातंही उघडलेले नाही. निकालाचे कौल हाती येताच आम आदमी पक्षाच्या कार्यालयात जल्लोष सुरु झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Arvind Kejariwal s wife Sunita Kejariwal birthday