बलात्कार प्रकरणी आरामबापूचा आज निकाल, चार राज्यांत अलर्ट

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला जाईल. 7 एप्रिलाला अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 25 एप्रिलला याबाबत निकाल जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले होते.

जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आज राजस्थान, गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आसारामची भक्तमंडळी व अनुयायी या चार राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला जाईल. 7 एप्रिलाला अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 25 एप्रिलला याबाबत निकाल जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले होते.

राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर जी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती आजही उद्भवण्याची चिन्हे आहेत. यासाठीच पूर्व तयारा करून, जोधपूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच येथे अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जोधपूर व परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे, त्यामुळे जोधपूरला छावणीचे रूप आले आहे.    

 

Web Title: today asaram bapu final verdict on rape case 4 states in high alert