भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशींना गुगलकडून 'डुडल'

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

पती गोपाळराव यांनी आनंदी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते. ते त्यांच्या शिक्षणाच्या मुद्यावर गंभीर होते. गोपाळराव यांच्या प्रोत्साहनामुळे आनंदी जोशींनी वयाच्या 21 व्या वर्षी 1886 मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया वैद्यकीय महाविद्यालयातून 'एमडी'ची पदवी प्राप्त केली. त्या देशातील पहिला महिला डॉक्टर बनल्या. 

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती. आनंदी जोशी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना गुगलकडून 'डुडल'द्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये झाला. अत्यंत जिद्द, मेहनतीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेमध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्या देशातील पहिला महिला डॉक्टर ठरल्या.

Anandi Gopal Joshi

आनंदी जोशी यांचा जन्म 31 मार्च, 1865 मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. अवघ्या 9 वर्षांच्या असताना आनंदी यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नापूर्वी त्यांचे नाव यमुना होते. मात्र, लग्नानंतर त्यांचे नाव आनंदी ठेवण्यात आले. त्यांचे पती गोपाळराव यांनी आनंदी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते. ते त्यांच्या शिक्षणाच्या मुद्यावर गंभीर होते. गोपाळराव यांच्या प्रोत्साहनामुळे आनंदी जोशींनी वयाच्या 21 व्या वर्षी 1886 मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया वैद्यकीय महाविद्यालयातून 'एमडी'ची पदवी प्राप्त केली. त्या देशातील पहिला महिला डॉक्टर बनल्या. 

आनंदी जोशी यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी होते. अमेरिकेत पहिल्यांदा जाणारी व्यक्ती म्हणूनही आनंदी जोशी यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली देण्यात आली आहे. 'Anandi Gopal Joshi's 153rd Birthday' या शिर्षकानुसार गुगलकडून डुडल बनविण्यात आले. 

Web Title: today google dedicates its doodle to first physician of india anandi gopal joshi