
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा
1.पुणे : तनिष्क ज्वेलर्समधून महिलांनी 4 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास!
आरोपी महिला घटनेच्या दिवशी दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बांगडी विभागात गेल्या. रविवारी (ता.3) दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सविस्तर बातमी-
2.बिग बींची 'कॉलर ट्यून' डोक्यात जाते; थेट हायकोर्टात याचिका दाखल
कोणालाही फोन केला की ऐकू येणारी कॉलर ट्यून 'नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं' ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आहे. सविस्तर बातमी-
3.जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तारीख जाहीर; प्रवेशासाठी 75 टक्के गुणांची अट हटवली
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. तसंच आयआयटीमध्ये प्रवेशासाठी 75 टक्के गुण मिळणं बंधनकारक असल्याची अट काढून टाकण्यात आली आहे. यावर्षी परीक्षेचं आयोजन आयआयटी खडगपूर करणार आहे. सविस्तर बातमी-
4.सोलापूरकरांसाठी सोनेरी दिवस! पोस्ट तिकिटाच्या माध्यमातून भारत सरकारतर्फे "चार हुतात्म्यां'चा गौरव
"हुतात्मा दिनाचे' औचित्य साधून 12 जानेवारी रोजी सोलापूरचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण व लोकार्पण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. सविस्तर बातमी-
5.अवघ्या तीन दिवसात पोलिस भरतीचा जीआर गृहविभागाकडून रद्द
एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलिस भरतीचा जीआर अवघ्या तीन दिवसांत गृहविभागानं मागे घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूयएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे. सविस्तर बातमी-
6.हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलींनी दिली प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर बातमी-
7. अमेरिकेत समर्थकांच्या गोंधळानंतर ट्रम्प नरमले; म्हणाले, सत्तेच्या हस्तांतरणासाठी तयार पण...
अमेरिकन काँग्रेसनं जो बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील आणि कमला हॅरिस या उप राष्ट्राध्यक्ष असतील अशी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या संयुक्त सत्रात सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि नॅन्सी पलोसी यांच्यासह जाहीर केलं. सविस्तर बातमी-
8. ब्रेकिंग: कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने बजावले समन्स
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. सविस्तर बातमी-
9. विधवा भावजयीसोबत लहान दीराची थाटामाटात लग्नगाठ, वऱ्हाडी-गावानेही वाजविल्या टाळ्या!
भाऊबंद, गावकरी व समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथे आज विधवा भावजयीबरोबर लहान दिराने लग्नगाठ बांधली. वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिल्याने या अनोख्या विवाह सोहळ्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभशीर्वाद दिले. सविस्तर बातमी-
10.VIDEO : 'माझा पासपोर्ट जप्त झाला नाही, बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय षडयंत्र'
विजय वडेट्टीवार यांचा आज पासपोर्ट जप्त झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावरच त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. २०१२मध्ये पासपोर्ट काढण्यात आला. त्यावेळी एजंट सही घेऊन गेला. सविस्तर बातमी-
11. शेतकरी झुकणार नाहीत; 2024 पर्यंत आंदोलन करण्याची तयारी
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गुरुवारी ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढू असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी-
येथे वाचा- दुपारच्या बातम्या
येथे वाचा- ब्रेकफास्ट अपडेट्स