Today was voted for the Talegaon Panchayat Goa
Today was voted for the Talegaon Panchayat Goa

गोवा : ताळगाव पंचायतसाठी उत्स्फूर्त मतदान 

गोवा : ताळगाव पंचायतीसाठी आज झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. काही मतदान केंद्रावर मतदारांच्या सकाळच्यावेळी रांगा दिसून आल्या. दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे.

पंचायतीच्या 11 पैकी 10 प्रभागांसाठी हे मतदान होत असून 28 उमेदवार आहेत. पणजी पोटनिवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे आमदार बाबुश मोन्सेरात यांचे समर्थन असलेला ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलेपमेंट फ्रंट गट निवडणूक रिंगणात आहे. या गटाविरोधात असलेल्या उमेदवारांना भाजपने समर्थन दिले आहे. मोन्सेरात यांच्या गटाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे तर इतर 10 उमेदवारही जिंकतील असा दावा मोन्सेरात यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com