25 जून भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस

सोमवार, 25 जून 2018

आजचा दिवस हा एकप्रकारे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली. 25 जून 1975 पासून लागू करण्यात आलेली आणीबाणी 21 मार्च 1977 रोजी संपुष्टात आली. आणीबाणीचा हा जवळपास 21 महिन्याचा कालावधी होता. 

त्यावेळी, इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले. तसेच, प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींनासुद्धा या निवडणुकीत हार पत्करावी लागली होती. आजही आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते.

Web Title: todays date emergency applied in india