आजची रात्र खूप वेळ झोपेची!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

आजचा 22 डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वांत लहान दिवस असून, रात्र मात्र मोठी असेल. बुधवार 21 डिसेंबरला सायंकाळी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणचा प्रारंभ होतो. त्यामुळे 22 डिसेंबर हा दिवस केवळ 10 तास 57 मिनिटांचा तर, रात्र 13 तास तीन मिनिटांची असेल, अशी माहिती प्रख्यात खगोलतज्ज्ञ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी "सकाळ'ला दिली.

आजचा दिवस सर्वांत लहान असल्याने कामकाजासाठी अवधी कमी पडणार असला तरी निद्राप्रेमींसाठी हा दिवस आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. आगामी वर्षात 21 जून 2017 हा सर्वांत मोठा दिवस असून, यंदा नववर्ष 1 सेकंद उशिराने सुरू होईल, असेही सोमण यांनी सांगितले.

22 डिसेंबरला सूर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला "विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. तेव्हा सूर्याचे उत्तरायण प्रारंभ होत असल्याने या बिंदूवर सूर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वांत लहान दिवस आणि सर्वांत मोठी रात्र ठरते. यानंतरच्या कालावधीत दिनमान वाढत जाणार आहे. रात्रीमान कमी होत जाईल, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. दरम्यान, आजचा दिवस सर्वांत लहान असल्याने ग्रामीण भागातील नैसर्गिक प्रकाशावर अवलंबून असलेल्यांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी कठीण आहे. कारण पहाट उशिरा होऊन शेतीच्या कामांना उशीर होईल, तर रात्र लवकर झाल्याने जास्त काळ अंधाराचा सामना करावा लागणार आहे. याउलट कृत्रिम प्रकाशावर जगणाऱ्या शहरी भागाला या लहान दिवसाची तोशीश पडणार नाही. या दिवशी सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी पर्यटक गुलाबी थंडीची मजा लुटत गर्दी करतात आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचेदेखील जल्लोषात स्वागत करतात.

उत्तरायण-पित्रायण...अशाही आख्यायिका
आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करत असल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. पौराणिक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्म पितामह यांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छामरण प्राप्त झाल्याने या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला "पित्रायण' असेदेखील म्हटले जाते.

नववर्ष एक सेकंद उशिराने
22 डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. त्यामुळे यंदा नववर्ष एक सेकंद उशिराने प्रारंभ होत असल्याची माहिती सोमण यांनी दिली. 23 मार्च 2017 ला दिवस आणि रात्र समान 12-12 तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम वाढून 21 जूनला सर्वांत मोठा दिवस असेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: todays day is small and night is big

टॅग्स