छत्तीसगडमध्ये शौचालये चोरीस गेल्याची तक्रार

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

कागदोपत्री अस्तित्व; अनुदान लाटल्याचा संशय

विलासपूर: एका महिलेने आपल्या घरातील शौचालये चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करत त्याचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उपलब्ध करून दिलेली दोन शौचालये फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याची तसेच, त्याचा निधीही प्रदान केल्याची बाब अमरपूर गावातील रहिवाशी बेला पटेल (वय 70) व त्यांची मुलगी चंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. यामागे ज्या कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही दोघींनी केली आहे.

या दोन्ही महिला विधवा असून, त्या स्वतंत्रपणे एकाच गावात राहतात. त्यांनी 2015 मध्ये संबंधित योजनेअंतर्गत शौचालयांची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांना अनुदान मंजूर झाले होते. मात्र, एक वर्ष लोटले तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उजेडात आला. आरटीआय कार्यकर्ता सुरेंद्र पटेल यांनी माहिती अधिकाराअंतर्गत केलेल्या अर्जाद्वारे यास दुजोरा मिळाला आहे.

Web Title: toilets have been stolen in Chhattisgarh