नीरज चोप्राला मिळाली Mahindra XUV700; महिंद्रांनी पाळला शब्द

या स्पेशल एडिशन कारवर नीरज चोप्राचं रेकॉर्डही प्रिंट करण्यात आलंय
Anand Mahindra_Neeraj Chopra
Anand Mahindra_Neeraj Chopra

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला महिंद्राची XUV 700 ही खास एडिशन कारची डिलिव्हरी मिळाली आहे. या कारसोबत फोटो काढत नीरजने तो ट्विट केला आहे. नीरजने पदक जिंकल्यानंतर लगेचच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्याला खास कार भेट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. आपला हा शब्द त्यांनी पाळला आहे.

नीरजला भेट दिलेली ही कार खास आहे कारण ती खास नीरजसाठीच बनवण्यात आली आहे. कारवर नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याची नोंद प्रिंट करण्यात आली आहे. तसेच कारमध्ये सर्व अत्याधुनिक नवे फिचर्स समाविष्ट आहेत. नीरजसाठी ही कार भेट देणं आपलं भाग्य असल्याचं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. दरम्यान, नीरजला कारची डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांनं कारची पारंपारिक पद्धतीनं पूजा करत छान फोटो सेशन करुन घेतलं. त्यानंतर हा फोटो त्यानं ट्वीट केला आणि आपल्याला खास कस्टमाइज कार भेट दिल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचे आभार मानले.

अशी आहेत महिंद्रा XUV700ची फिचर्स

दरम्यान, असं सांगितलं जात आहे की, XUV700 मध्ये सर्व नवीन अत्याधुनिक बाबी असतील. तिचा लूक एकदम स्पोर्टी असेल. ज्यामध्ये सी आकारातील एलईडी डीआरएल अर्थात हेडलॅम्प असतील. बाणाच्या आकारातील एलईडी टेल लाईट असतील. कारमध्ये टीईटी डिस्प्लेसह कन्टेम्पररी अंतर्गत रचना असेल. वाईड टचस्क्रीन, मल्टिफंक्शन स्टिअरिंग व्हील, संपूर्ण डॅशबोर्डवर चंदेरी ट्रिम असेल याच रंगाचे एअरकॉन आणि कन्ट्रोल्स असतील. ही XUV700 कार अॅमेझॉन अलेक्सा कम्पॅटिबिलिटी असेल. यामध्ये पॅनोरमिक सनरुफ असेल तसेच सोनीची थ्रीडी सराऊंड सिस्टिम, त्याचबरोबर ZIP, Zap, Zoom आणि Costom हे चार ड्रायव्हिंग मोड आहेत. कॅबिन एअरफिल्टर, स्टार्ट-स्टॉपसाठी पुश बटन, अॅटोमॅटिक एसी, एलईडी लाईटिंग, फ्लश-फिटेड डोअर हँडल्स आणि इतरही अनेक अत्याधुनिक सुविधा या कारमध्ये असणार आहेत.

Anand Mahindra_Neeraj Chopra
उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, काळजी घेण्याचं आवाहन

महिंद्रा XUV700 कारचा २ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि २.२ लिटर डिझेल पावरप्लान्ट हे दोन पर्याय असतील. पेट्रोल युनिट एम स्टॅलिन हे सध्याच्या महिंद्रा थारमध्ये वापरण्यात आलं आहे. पण हे इंजिन अधिक पावरफुल बनवण्यात येणार आहे. तर डिझेल इंजिन हे सध्याच्या XUV 500 प्रमाणेच असणार आहे. हे दोन्ही इंजिन्स मॅन्युअल आणि अॉटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध असेल. त्याशिवाय XUV700 मध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा पर्यायही मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com