गडकरी म्हणतात, 'टोल कधीही बंद होणार नाही'

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

कारमध्ये बुस्टर सीट

गडकरी यांनी काल (सोमवार) कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे.

नवी दिल्ली : भाजपकडून राज्यात टोलमुक्तीबाबत सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. असे असताना आता याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील. 

टोल वसुलीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे. त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात आहेत. पाच वर्षांत देशात 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीही बंद होऊ शकणार नाही. मात्र, गरजेनुसार त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

कारमध्ये बुस्टर सीट

गडकरी यांनी काल (सोमवार) कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll Collection Will Never Be Stopped says Nitin Gadkari