आल्वारिस यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पणजी पोलिसांनी क्‍लॉड आल्वारिस, राहुल बासू व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्यानंतर त्यावरील सुनावणी आज झाली, तेव्हा पोलिसांनी त्याला विरोध केला.

पणजी - खाण कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयित व गोवा फाउंडेशनचे संचालक डॉ. क्‍लॉड आल्वारिस यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय उद्या (29 जून) ठेवण्यात आला आहे. 

पणजी पोलिसांनी क्‍लॉड आल्वारिस, राहुल बासू व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्यानंतर त्यावरील सुनावणी आज झाली, तेव्हा पोलिसांनी त्याला विरोध केला. खाण कार्यालयाला कुलूप ठोकण्यासाठी कोण कोण आणखी त्यामध्ये सामील झाले होते याचा शोध घ्यायचा आहे. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या फलकासाठी कोणी मदत केली याचा तपास करायचा आहे अशी बाजू पोलिसांनी मांडली. 

राज्यातील खाण घोटाळाप्रकरणी अर्जदार डॉ. क्‍लॉड आल्वारिस हे लढा देत आहेत. पर्यावरण बचावासाठी ते सरकार विरोधात लढा हेत असल्याने त्यांच्याविरुद्ध सरकारचा रोष आहे. हा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून त्याची चावी पोलिसांकडेच सुपूर्द केली होती. त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवून त्यांना अटक करण्याची पोलिसांचा डाव आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tomorrow decision on Alwaris anticipatory bail