Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या दोषींना उद्या फाशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

विभक्त होण्यासाठी पत्नीचा अर्ज

- फाशीची तयारी पूर्ण

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींचे सगळे कायदेशीर मार्ग आता संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता उद्या (ता. 20) सकाळी साडेपाच वाजता सर्व दोषींना फाशी देण्यात येणार आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्भया प्रकरणातील दोषींपैकी तिघांचे नातेवाईकांनी कारागृहात जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर चौथा दोषी अक्षय याच्या कुटुंबातील कोणीही त्याला अद्याप भेटायला आले नसल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पवन गुप्ता आणि विनय शर्मा या दोघांच्या नातेवाईकांनी 29 फेब्रुवारीला कारागृहातील बंद खोलीत भेट घेतली. मुकेश सिंग याच्या कुटुंबियांनी 2 मार्च रोजी भेट घेतली होती.

विभक्त होण्यासाठी अर्ज

अक्षय ठाकूरने आता कुटुंबियांना भेटण्याची अपेक्षा सोडून दिली आहे. तसेच त्याची पत्नी पुनीता देवीने विभक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अक्षय ठाकूरच्या मृत्यूनंतर तिला विधवेचे जगणे नको आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तिने हा अर्ज दाखल केला आहे. 

nirbhaya case akshay thakur wife

फाशीची तयारी पूर्ण

दोषींना फाशी देण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी फाशीची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.

खोलीबाहेर कडक सुरक्षा

तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोषींच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जात आहे. या सर्व दोषींच्या खोलीबाहेर अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow Punishment to Convicted of Delhi Nirbhaya Case