Positive Story: टांगेवाला ते हजारो कोटीच्या कंपनीचा मालक; MDH च्या मालकांची प्रेरणादायी कहानी!

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 29 October 2020

पाचवीत शाळा सोडल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी अनेक ठिकाणी काम केलं होतं. तसेच त्यांनी हार्डवेअर कधी तांदळाच्या तर वस्रोद्योग कंपन्यांत काम केलं आहे.

दिल्ली: मागील काही महिन्यांपुर्वी MDHचे मालक धर्मपाल गुलाटी यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. जी नंतर खोटी बातमी होती हे सिध्द झाले. ते सध्या 97 वर्षाचे आहेत. गुलाटी यांचा जन्म फाळणीपुर्वी 1923 ला पाकिस्तानातील सियालकोटमध्ये झाला होता. धर्मपाल गुलाटी यांचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झालं असून त्यांच्या जीवनाची कथा मोठी संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. 

MDH नाव कसं पडलं-
गुलाटी यांच्या वडिलांचे सियालकोट येथे मसाल्याचे दुकान होते. त्यांचे नाव महाशिया दी हट्टी होते. यामुळेच गुलाटींच्या मसाल्याच्या ब्रॅंडचे नाव MDH पडले आहे. फाळणीनंतर धर्मपाल गुलाटी यांनी 1959 साली दिल्लीत मसाल्याचे दुकान सुरु केले होते. त्यांनी दिल्लीत कधीकाळी टांगाही चालवला होता. पण आज गुलाटी यांचा देशातील मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नाव घेतलं जातं. MDH यांना 2018 साळी तब्बल 213 कोटींचा फायदा झाला होता. धर्मपाल गुलाटी यांना देशात पद्म-भूषण या पुरुस्कारानेही गौरविण्यात आलं आहे.

India: How Dharam Pal Gulati of MDH went from street seller to spice king |  India – Gulf News

वाचा सविस्तर: सभेला हजारोंची गर्दी, उमेदवाराने भाषणाला केली सुरुवात तेवढ्यात...

बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या-
पाचवीत शाळा सोडल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी अनेक ठिकाणी काम केलं. त्यांनी हार्डवेअर कधी तांदळाच्या तर वस्रोद्योग कंपन्यांत काम केलं आहे. त्यानंतर गुलाटींनी त्यांच्या वडिलांच्या दुकानातही काम केलं. वयाच्या 18 व्या वर्षी धर्मपाल यांचा विवाह झाला.   

खिश्यात होते फक्त 1500 रुपये-
फाळणीनंतर भारतात आल्यानंतर त्यांच्याजवळ फक्त 1500 रुपये होते, जे त्यांच्या वडिलांनी दिले होते. जवळ असलेल्या 1500 रुपयांमधील 650 रुपये खर्चून धर्मपाल यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला होता. नंतर 1959 साली गुलाटी यांनी एक मसाल्याचे दुकान सुरु केलं ज्याचं नाव त्यांनी महाशियां दी हट्टी सियालकोट वाले असं ठेवलं होतं. MDH च्या मसाल्याचा दर्जा हळूहळू त्यांची ओळख बनत गेली. 

Mahashay ji old photo

हेही वाचा - पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO

वार्षिक उलाढाल 1000 कोटी रुपये-
प्रामाणिकपणा आणि दर्जाच्या जोरावर MDH या मसाला ब्रॅंडची प्रगत्ती उत्तरोत्तर होत गेली. प्रत्येक अडचणीवर मात करत-करत 1996 साली गुलाटी यांनी दिल्लीत मसाल्याची कंपनी सुरु केली. त्यानंतर MDH चा मसाला संपुर्ण भारतासह जगभरात प्रसिध्द आहे. सध्या MDH देशातील मसाल्यामधला सर्वात मोठा ब्रॅंड ठरला आहे. धर्मपाल गुलाटी यांची वार्षिक कमाई सध्या कोटींमध्ये आहे. मागील वर्षाची कंपनीची उलाढाल 1 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. स्वतः धर्मपाल गुलाटी यांची कमाई तब्बल 500 कोटींच्या घरात आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tongawala to masalaking Dharmpal Gulati success story