'टॉप 10' शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

'फोर्ब्स'कडून अशा प्रकारची यादी जारी करण्यात येते. ज्या लोकांनी देशासह जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि विशेष कामगिरी केली, अशा लोकांना या यादीत स्थान दिले जाते. या यादीमध्ये पंतप्रधान मोदींनाही स्थान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी 'फोर्ब्स'ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. 'फोर्ब्स'च्या यादीत मोदींनी पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान प्राप्त केले आहे. तसेच या यादीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत. 

'फोर्ब्स'कडून अशा प्रकारची यादी जारी करण्यात येते. ज्या लोकांनी देशासह जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि विशेष कामगिरी केली, अशा लोकांना या यादीत स्थान दिले जाते. या यादीमध्ये पंतप्रधान मोदींनाही स्थान देण्यात आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (13 वा क्रमांक), ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (14 वा) आणि अॅपलचे सीइओ टीम कूक (24 वा क्रमांक) असून, त्यांच्यापेक्षाही पुढे पंतप्रधान मोदी आहेत. 

याशिवाय मोदींची लोकप्रियता इतकी मोठी आहे, की फेसबुकवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्यांच्या यादीतही त्यांचे स्थान महत्वाचे आहे. पंतप्रधान मोदींना फेसबुकवर 4 कोटी लोक फॉलो करत आहेत. त्यामुळे जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींपैकी एक ते ठरले आहेत. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता इतकी वाढली, की देशातच नाहीतर परदेशातही त्यांची लोकप्रियता कायम आहे.

Web Title: In the Top 10 list of powerful people Narendra Modi is in ninth number