गुगलच्या 'मोस्ट सर्चड् पर्सनॅलिटी 2019' मध्ये या आहेत टॉप 10 पर्सनॅलिटी !

वृत्तसंस्था
Thursday, 19 December 2019

Flashback 2019 : गुगल सर्वात जास्त सर्च झालेल्या गोष्टींचं, नावांची माहिती देतं. भारतात अशा टॉप दहा पर्सनालिटी आहेत ज्यांना 2019 मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं गेलं आहे. कोण आहे या लिस्टमध्ये ते जाणून घ्या ! 

मुंबई : सोशल मीडिया आणि इंटरनेटवर फक्त लोकप्रिय व्यक्तीच फेमस होतात असं नाही ! कोणी इंटरनेटवर कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. साहजिकच व्हारल झाल्यावर गुगलच्या सर्चमध्ये लोक त्यांना शोधतात, त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. गुगल सर्वात जास्त सर्च झालेल्या गोष्टींचं, नावांची माहिती देतं. भारतात अशा टॉप दहा पर्सनालिटी आहेत ज्यांना 2019 मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं गेलं आहे. कोण आहे या लिस्टमध्ये ते जाणून घ्या ! 

Image may contain: 1 person, smiling

1. अभिनंदन वर्तमान 
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ-16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावताना पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडले होते. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. विंग कमांडर हे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरले होते. परंतु, ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी नागरिकांनी मोठी मारहाण केली होती.
पाकिस्तानच्या छळाला अभिनंदन हे मोठ्या धाडसाने सामोरे गेले होते. पाकिस्तानने तीन दिवसानंतर अभिनंदन यांची सुटका केली होती. जगातील महत्त्वाच्या देशांच्या दबावानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसानंतर भारताच्या ताब्यात दिले. त्यानंतर अभिनंदन यांच्या धाडसाने संपूर्ण देशानेच त्यांचं कौतुक केलं. त्यामुळे गुगलवर अभिनंदन हे भारतामध्ये सर्वाधिक सर्च केले गेलेली व्यक्ती ठरली आहे ! 

Image may contain: 1 person, smiling, close-up

2. लता मंगेशकर 
ग्यानसम्राज्ञी लता मंगेशकर य़ांच्या सुरेल आवाजाचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या आवाज म्हणजे एक वेगळचं रसायन आहे आणि त्यांचा आवाज म्हणजे एका प्रकारचा चमात्कार म्हणलं तर वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी लतादीदींची तब्येत बिघडली आणि संपूर्ण देश काळजीत होता. मात्र लाखो चाहत्यांची प्रार्थना आणि प्रेमाने त्यांच्या तब्येतीत सुधार होऊन आता त्यांच्या तब्येतीत सुधार होऊन बऱ्या झाल्या आहेत. सोशल मीडिया सेंसेशन रानु मोंडल  यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी झाली होती. लता मंगेशकर यांना गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे.

Image may contain: 1 person, beard

3. युवराज सिंग 
धडाकेबाज फलंदाज ते उपयुक्त अष्टपैलू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 19 वर्षांमधील वाटचालीचा मोठा भाग आहे. खालावलेली कामगिरी आणि तरुण खेळाडूंच्या उदयामुळे युवराजसिंग मागे पडला अन् त्याने निवृत्ती घोषित केलेली असली तरीही आजवरच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही युवराजचे स्थान अढळ आहे. नुकताच युवराजचा 38 वा वाढदिवस साजरा झाला. यावर्षीच्या गुगल सर्चमध्ये क्रिकेटर युवराज सिंगचं नाव आलं आहे. 

Image may contain: 1 person, sitting

4. आनंद कुमार 
आनंद कुमार यांनी 'सुपर 30' कोचिंग 2002 मध्ये सुरु केलं ते पटनामध्ये. गरीब मुलांना 'सुपर 30' कोचिंगद्वारे इंजिनियरींग प्रवेश परिक्षाची अर्थात IIT ची तयारी करुन घेणारे लोकप्रिय गणित शिक्षक म्हणजेच आनंद कुमार. आनंद कुमार यांच्या अनमोल कामावर आधारीत बायोपिक नुकताच प्रदर्शित झाला.'सुपर 30' असं त्या चित्रपटाचं नाव असून त्याने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाल केली. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका अभिनेता हृतिक रोशन याने साकारली. आनंद यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. आनंद कुमार यांचं नाव यावर्षीच्या गुगल सर्च लिस्टमध्ये आलं आहे. 

Image may contain: 1 person, smiling, sitting and beard

5. विकी कौशल
विकी कौशल हे नाव आता बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालं आहे. मेहनत आणि उत्तम अभिनयाने विकी कौशल सध्या टॉप कलाकारांच्या यादीमध्ये गेला आहे. 'हाऊ इस दि जोश' हा डायलॉग आणि विकी कौशलची प्रसिद्धी सर्वाधिक झाली आहे. मसान, राझी, संजू, उरी असे सुपरहिट सिनेमे करत दिवसेंदिवस त्याची फॅन फोलोइंग वाढतेय.शिवाय महिला वर्गामध्ये विकीची पसंती सर्वाधिक असून तो चाहता बनला आहे. या अमेझिंग अभिनेत्याचं नाव गुगलवर या वर्षी सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे. 

Image may contain: 1 person, baseball and outdoor

6. ऋषभ पंत 
गुगलच्या सर्चलिस्टमध्ये 2019 या वर्षात जास्त सर्च केलं गेलेली पर्सनॅलिटी आहे क्रिकेटर ऋषभ पंत. भारताचा तरुण विकेट किपर ऋषभ पंतवर मध्यंतरी प्रचंड टीका झाली होती. T-20 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या खेळीनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी #DhoniWeMissYouOnField हा हॅशटॅग सुरु केला होता. ऋषभ पंतच्या विकेट किपिंगवर प्रचंड टीका करण्यात आली होती. 

Image may contain: 1 person, close-up

7. रानू मोंडल 
 रानुं मंडल हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एका रात्रीत रानु मंडल या स्टार झाल्या. रेल्वे स्टेशन ते गायक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोलकाताच्या स्टेशनवर मधुर आवाजात गाण्याऱ्या रानु यांचा व्हिीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या खऱ्या अर्थाने स्टार बनल्या. त्यानंतर रानु यांनी हिमेश रेशमियासोबत अल्बम केले, आता त्या सेलिब्रिटी आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने रानू चर्चेत असतात, सोशल मीडियावर व्हायरल होतात. गुगलच्या सर्च लिस्टमध्ये रानू मोंडल यांचं नाव सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे. 

Image may contain: 1 person, smiling, close-up

8. तारा सुतारीया 
बॉलिवूडमध्ये इन्ट्री करणं इतकं सोप्पं काम नाही. बॉलिवूडच्या कलाकारांची मुलं म्हणजे स्टार किड्सना अनेकदा सहजपणे इन्ट्री मिळते. पण सामान्यांतून आलेल्या मुलांना अधिक मेहनत घ्यावी लागते. एका चित्रपटातच बॉलिवूडमध्ये नाव कमवलेली अभिनेत्री म्हणजे तारा सुतारीया. ताराने 'स्टुडंट ऑफ दि इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तारा उत्तम गाणंही गाते. त्याशिवाय ताराने 'मरजावां' या चित्रपटातून काम केलं आहे. मध्यंतरी ताराचं नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी जोडलं जात होतं. पण त्यानंतर आदार जैनसोबत एका पार्टीमध्ये दिसल्यानंतर त्या दोघांच्या नावांची चर्चा सुरु झाली. तारा सुतारीया गुगल सर्चलिस्टमध्ये सर्वाधिक सर्च पर्सनिटी म्हणून आठव्या स्थानावर आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, shoes and indoor

9. सिद्धार्थ शुक्ला 
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोची लोकप्रियतता सर्वात जास्त आहे. हा शो कोणत्या ना कारणाने चर्चेत असतो. घरातील कॉन्ट्रॉवर्सी, भांडणे यांमुळे बिग बॉसची फॅन फोलोइंग जास्त आहे. सध्या त्याचं 13 वं पर्व सुरु आहे आणि भाईजान म्हणजेच सलमान खान त्याचं सुत्रसंचालन करत आहे. यंदाच्या पर्वातील घरातील सदस्य आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नाव गुगलवर यावर्षी सर्वाधिक सर्च केलं गेलयं. सध्या घरातील तो सर्वात जास्त चर्चेत असणारा सदस्य आहे. 

Image may contain: 1 person

10. कोयना मित्रा 
कोयनाचा जन्म झाला तो 7 जानेवारी 1984 ला बंगाली घरात झाला.कोयनाला 2004 मध्ये 'सुपरमॉडल इंडिया अर्वॉर्ड' मिळाला होता. राम गोपाल वर्माच्या 'रोड' या चित्रपटासह 2004 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'ओ साखी साखी' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. अनेक वर्ष ती इन्डस्ट्रीपासून दूर होती. मात्र याचवर्षी चेक बाऊंसच्या प्रकरणात तिला 6 महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंतर बिग बॉस 13 च्या पर्वात ती दिसली. तिच्या खेळीमुळे पुन्हा एकदा कोयना चर्चेचा विषय ठरली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top 10 most searched Personalities on Google in India 2019