ब्रेकफास्ट अपडेट्स: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ते व्हॉट्सऍपला दे धक्का: महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

टीम ई सकाळ
Monday, 18 January 2021

महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा...

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले.  सविस्तर वाचा
 

नवी दिल्ली : 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना असलेला आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी हा मार्ग वापरायचा ठरवला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सऍपने जेव्हा नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नव्या प्रायव्हयी पॉलिसीमुळे यूझर्समध्ये संभ्रम आहे आणि कंपनी यूझर्सची शंका दूर करण्यास अजूनतरी यशस्वी ठरलेली नाही. सविस्तर वाचा
 

मुंबई : ब-याचवेळा कलाकृतीत आशयात्मकदृट्या काही दम नसल्यास मग जे काही तयार केलं आहे ते प्रेक्षकांच्या माथी मारण्यासाठी वादाची मदत घेतली जाते. सविस्तर वाचा
 

ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी 54 धावांच्या आघाडीसह डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस जोडीने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. सविस्तर वाचा

पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. सविस्तर वाचा

2021 वर्ष इलेक्ट्रिक गाड्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. 2020 मध्ये कोरोना संकटामुळे इलेक्ट्रिक गाड्या कमी विकल्या गेल्या. त्यामुळे यावर्षी या गाड्यांवर मोठी सूट दिली जात आहे. सविस्तर वाचा

सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून, त्यात धनंजय डिकोळे, गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे आणि संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुक्‍यातील तथा विधानसभा मतदारसंघातील किती ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकणार, यातून पक्षातील स्ट्रॉंग जिल्हाप्रमुख ठरणार आहे. सविस्तर वाचा

सोलापूर : मद्यपान करणाऱ्यांना तुर्तास लस टोचली जाणार नाही. मात्र, लसीकरणापूर्वी दोन महिने आणि लसीकरणानंतर दोन महिन्यांपर्यंत मद्यपींनी मद्य प्राशन करु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : रस्ते अपघातातील नुकसान भरपाई संदर्भात दिल्लीच्या हायकोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. एखाद्या रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या पालकांना नुकसान भरपाईची अधिकार आहे, असा निकाल हायकोर्टाने दिला असून, या निकालाची प्रत सर्व मोटार अपघातात न्यायाधिकरणांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top 10 news latest news Corona Vaccination Farmers Protest whatsapp tandav cricket