भाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी

टीम ई-सकाळ
रविवार, 8 डिसेंबर 2019

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा पटकावेल. तसेच मुंबईचा आगामी महापौर हा भाजपचा असेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती दिली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा पटकावेल. तसेच मुंबईचा आगामी महापौर हा भाजपचा असेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 30 डिसेंबरपर्यंत भाजप मुंबई अध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे.

- सविस्तर बातमी 

Image may contain: outdoor

दिल्ली : मंडी परिसरात लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील अनाज मंडी परिसरातील झाँसी की राणी रस्त्यावरील एका कारखान्याला रविवार (ता.8) पहाटे भीषण आग लागली. यामध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 50 जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. घटनास्थळी उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. 600 स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या या कारखान्यात शालेय वस्तूंची निर्मिती केली जात होती.

- सविस्तर बातमी

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Unnao Rape Case : कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

उन्नाव (उत्तर प्रदेश) : उन्नाव येथील बलात्कारपीडितेवर रविवारी (ता.8) तिच्या मूळगावी दफन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शुक्रवारी (ता.6) रात्री या पीडितेने अखेरचा श्वास घेतला. जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत नाहीत, तोपर्यंत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, असा इशारा पीडितेच्या घरच्यांनी दिला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीय तयार झाले.

- सविस्तर बातमी  

Image may contain: 1 person, smiling

लता मंगेशकरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

मुंबई : भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली. २८ दिवसांच्या उपचारानंतर त्या घरी परतल्या आहेत. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. लतादीदींची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या. 

- सविस्तर बातमी

No photo description available.

अमृता फडणवीसांना शिवसेनेनं दिलं तासाभरात चोख प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद येथे स्मारक उभारण्यात येत आहे. या नियोजित स्मारकासाठी वृक्षतोड करण्यात आल्याचे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस केलं. त्यानंतर तासाभरातच शिवसेनेनं फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून फडणवीस यांच्यावर टीका केली. झाडं तोडण्यासाठी कमिशन घेणं हे भाजपचं धोरण असेल, असा टोमणा त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

- सविस्तर बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top 5 Marathi news of 8 December of state and national level