Coronavirus : कोरोना भारतात पसरतोय; रुग्णांची संख्या पोहोचली...

वृत्तसंस्था
Sunday, 8 March 2020

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, शनिवारी कोरोनाचे आणखी 3 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या 39 झाली आहे. यातील 36 जणांवर उपचार केले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या भारतात कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुग्राम, दिल्ली, तेलंगणासह जयपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. रविवारी आणखी 5 नवी प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे आता या रुग्णांची संख्या 39 झाली आहे. याबाबत केरळेच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा सांगितले, की राज्यात कोरोना व्हायरसचे 5 नवी प्रकरणं पुढे आली आहेत. या पाचही रुग्णांची टेस्ट पॉजिटिव्ह आहे. या सर्व रुग्णांना पथानामथिट्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

तसेच यातील 5 पैकी तीन जण इटलीहून परतले आहेत. त्यामुळे पठानमथिट्टा जिल्ह्यातील आणखी दोघे बाधित आहेत.

Image result for coronavirus

दरम्यान, चीनच्या वुहान येथून कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरत आहे. जगभरातून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 90 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर तीन हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

'येस’वरील निर्बंधांची १२५ बॅंकांना झळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total cases of Coronavirus has Increasing in india 39 Peoples Test Positive