Video : ताकदीला तोड नाही! तिरुपतीजवळ मर्सिडीजच्या धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे

अशा प्रकारचा अपघात होऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
mercedes benz
mercedes benzsakal

Mercedes Benz Tractor Accident : ट्रॅक्टरला धडकल्यानंतर गाड्यांचा चक्काचूर झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र, तिरुपतीजवळ घडलेल्या एका अपघाताची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, मर्सिडीजला धडकल्यानंतर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारचा अपघात होऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळ चंद्रगिरी बायपास रोडवर सोमवारी हा अपघात झाला. चुकीच्या बाजूने जाणार ट्रॅक्टर अचानक मर्सिडीज समोर आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरक्षः दोन तुकडे झाले. मात्र, यामध्ये मर्सिडीज कारचे फारसे नुकसान झाले नाही. या घटनेत कारमधील सर्वजण सुरक्षित असून, ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशातील मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी तेदेखील मर्सिडीजच्या कारमध्ये होते. मात्र, त्यांचे यामध्ये निधन झाले.

mercedes benz
Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सध्या तिरुपतीजवळ घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, 38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मर्सिडीज बेंझ कारच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत. हे दृश्य पाहून हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com