रुपयातील घसरणीपेक्षा व्यापारी तूट चिंताजनक 

पीटीआय
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : रुपयातील घसरणीपेक्षा वाढती व्यापारी तूट अधिक चिंताजनक असून, निर्यातवृद्धीसाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

नवी दिल्ली (पीटीआय) : रुपयातील घसरणीपेक्षा वाढती व्यापारी तूट अधिक चिंताजनक असून, निर्यातवृद्धीसाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

"सीआयआय'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात कुमार म्हणाले, "रुपयाचे मूल्य वधारल्यास काही प्रमाणात फायदे मिळतात; परंतु एक पाऊल मागे घेणेही आवश्‍यक आहे. रुपयाचे मूल्य जास्त असावे, असे मला वाटत नाही. सरकारला रुपयाचे मूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अवघड आहे. केवळ वित्तीय तुटीच्या आकड्यापुरते मर्यादित धोरण नसावे. अमेरिका, चीन आणि युरोपीय समुदाय वित्तीय तुटीला फारसे महत्त्व देत नाहीत. कोणीही नियमाप्रमाणे वागत नाही. आपणही आपल्या गरजेनुसार निर्णय घ्यायला हवेत.'' 

"सर्वांत चिंताजनक बाब वाढत्या व्यापारी तुटीची आहे. ही तूट कमी करण्यासाठी निर्यात वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सध्याच्या परिस्थितीत वित्तीय शिस्त आणि पतधोरण अधिक कठोर करणे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. देशातील दरडोई उत्पन्न अजूनही कमी आहे. त्यामुळे व्यापारी करार करताना आपण स्वत:ला फार मोठी अर्थव्यवस्था समजू नये,'' असे कुमार यांनी सांगितले. 

Web Title: Trade deficit worries over rupee depreciation