धुक्‍यामुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली : धुक्‍यामुळे दिल्लीतील रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असून दिल्लीतून सुटणाऱ्या 34 रेल्वेमार्गावरील गाड्या उशिराने धावत असून 13 हवाई मार्गांवरील विमानांची उड्डाणे उशिराने होत आहेत.

नवी दिल्ली : धुक्‍यामुळे दिल्लीतील रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असून दिल्लीतून सुटणाऱ्या 34 रेल्वेमार्गावरील गाड्या उशिराने धावत असून 13 हवाई मार्गांवरील विमानांची उड्डाणे उशिराने होत आहेत.

दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या आणि विमानतळावर उतरणाऱ्या सात आंतरराष्ट्रीय विमानांना विलंब होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा दक्षिणेकडील भाग, राजस्थानमधील काही भाग येथे गेल्या काही दिवसांपासून दाट धुके आढळून येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीसह, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही विपरित परिणाम होत आहे. पंजाब आणि हरियानावरही धुक्‍याची छाया पसरली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील रस्त्यावर अपघाताची शक्‍यता निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर रविवारी सकाळी धुक्‍यामुळे 50 वाहने एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर 36 जण जखमी झाले होते.

Web Title: Traffic affected due to fog