esakal | दिल्लीतील थरार! ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

delhi police dragged.

राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत दिल्लीतील एक ट्रॅफिक पोलीस कारच्या बॉनेटवर लटकलेला दिसत आहे.

दिल्लीतील थरार! ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत दिल्लीतील एक ट्रॅफिक पोलीस कारच्या बोनेटवर लटकलेला दिसत आहे. तरीसुध्दा कारचालक वेगाने गाडी चालवतंच आहे. तसेच कारचालक ट्रॅफिक पोलिसाला पाडण्याचाही प्रयत्न करत आहे. शेवटी कारचालक पोलिसाला पाडण्यात यशस्वी झाला असून तो तिथून पसार झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

पुढील काही तासांतच दिल्ली पोलिसांनी शुभम नावाच्या कारचालकाला पकडले आहे. तसेच त्याच्यावर नैऋत्य दिल्लीच्या कॅंटोंनमेंट पोलिस ठाण्यात  FIR ही दाखल केली आहे. 

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धौला कुआजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅफिक पोलिस महिपाल धौला कुआ येथे आपल्या टीमसोबत ड्युटी करत होते. दरम्यान, त्यांना एका कारला असलेली फॅन्सी नंबर प्लेट दिसली. वाहतूक नियमाच्या नियमामुळे महिपाल यांनी त्या कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हरने गाडी थांबवण्याऐवजी वेग वाढवला. ट्रॅफिक पोलीस महिपाल कारच्या दिशेने धावले, पण त्या तरुणाने महिपाल यांच्यावर गाडी घातल्याने महिपाल कारच्या बॉनेटवर पडले. 

व्होडाफोन आणि आयडियाच्या रेंजला ...

यामध्ये ट्रॅफिक पोलिस महिपाल यांना कोणतीही जखम झालेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभम आणि त्याचा मित्र राहुल यांना अटक केली आहे.  सध्या अशा अनेक घटना देशभरातून घडत आहेत. सध्या पोलिस पुढील कार्यवाही करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)