Train Accident: रेल्वेच्या सिग्नल दोषाचा मुद्दा ऐरणीवर; लोकल ट्रेनच्या यंत्रणेत आठ वर्षांत १८ हजार वेळा बिघाड

Train Accident:
Train Accident:esakal

मुंबई: ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. हा अपघात सिग्नल दोषामुळे झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईतील सिग्नल यंत्रणांमधील दोषांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या आठ वर्षांत साधारणतः १८ हजारांपेक्षा जास्त वेळा तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकल सेवांना फटका बसत असून प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. यासाठी रेल्वेने काही वर्षांपूर्वी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) ही अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु हा निर्णय कागदावरच आहे.

Train Accident:
Pune: महाराष्ट्र फाटकमुक्त होणार! CM शिंदे यांच्या हस्ते रेल्वेच्या नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून उपनगरीय लोकल ट्रेन म्हणून ओळखली जाते. दररोज ३ हजारांपेक्षा जास्त लोकल फेऱ्यांमधून मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावरून साधारणतः ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात; परंतु अनेक वेळा सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होतात.

२०१४ ते २०१९ पर्यंत गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वे मार्गावर १५ हजारांपेक्षा जास्त वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे; तर २०२० ते २०२३ पर्यंत साधारणतः ३ हजार सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सिग्नल यंत्रणेत होणारे बिघाड रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

डिजिटल सिग्नल यंत्रणा कागदावरच?

काही वर्षांपूर्वी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) ही अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला गेला.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी मयूटीपी- ३ ए ) अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा सीबीटीसी बसवण्यात येत आहे. १ हजार ३९१ कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. परंतु सध्या हा प्रकल्प कागदावरच आहे. यांसंदर्भात एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यासंदर्भातील माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

Train Accident:
lok sabha 2024: शरद पवारांनी उमेदवार घोषित केला? मात्र काँग्रेसवाले म्हणतात...; या जागेवरून वादाची शक्यता

आठ वर्षांतील बिघाड

वर्ष सिग्नल बिघाडाची संख्या

२०१४-१५ ३,७७८

२०१५-१६ ३,२४६

२०१६-१७ २,९०३

२०१७-१८ २,६०९

२०१८-१९ २,५९३

२०१९-२० १,७३२

२०२०-२१ कोव्हिड

२०२१-२२ २,०००

एकूण १८,८६०

काय आहे सीबीटीसी?

सीबीटीसी प्रकल्प मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार आणि हार्बरवरील सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर राबवण्यात येणार आहे. ही सिग्रल यंत्रणा डिजिटल आहे. यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधी नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतात. तसेच, पुढे असलेल्या लोकल संदर्भातही सिग्नल मिळतो. यामुळे लोकल वेळेत धावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com