रेल्वेच्या प्रवाशांची लूट थांबणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

"आयआरसीटीसी'तर्फे खाद्यपदार्थांचे अधिकृत दर जाहीर

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांना अनेकदा अवाच्या सवा दरांत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतींवर "नजर' ठेवण्यासाठी आता "आयआरसीटीसी'तर्फे पाण्यापासून रेल्वेगाड्यांतील अन्य खाद्यपदार्थांचे अधिकृत दर जाहीर करण्यात आले आहेत. यापेक्षा कोणी जास्त पैसे मागितले किंवा खराब दर्जाचे अन्न दिले तर सरळ रेल्वेला ट्विट करा किंवा तक्रार करा व खाद्यपदार्थांची बिले जरूर घ्या, असेही प्रवाशांना सांगण्यात आले आहे.

रेल्वेगाड्यांत, विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांतील पॅंट्री कारमध्ये बनविलेले खाद्यपदार्थही अवाच्या सवा दरांत मनमानीपणे विकले जातात अशा अनेक तक्रारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचपासून रेल्वे मंडळाच्या वरिष्ठांनाही सातत्याने मिळत होत्या. राजधानी, दुरांतो व शताब्दी एक्‍स्प्रेस गाड्यांतील खाद्यपदार्थांचे अनेक ठेकेदार अनेक वर्षांपासून रेल्वेला विळखा घालून बसल्याने त्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबद्दल तक्रारींचा पाऊस पाडूनही उपाययोजना होत नव्हत्या. प्रभू यांनी गेली दोन वर्षे या मुद्द्यावर सातत्याने चर्चा सुरू ठेवली व विविध उपायही अमलात आणले. पण ते प्रभावी ठरत नसल्याचेच दिसले. आता "आयआरसीटीसी'च्या खाद्यपदार्थांचे अधिकृत दरच जाहीर केले गेले असून तसे फलक प्रत्येक एक्‍स्प्रेस व मेल गाडीत तातडीने लावण्याच्या सूचना प्रभू यांनी दिल्या आहेत.

रेल्वे नवी अंत्योदय रेल्वेगाडी लवकरच सुरू करणार आहे. प्रभू यांच्या हस्ते आज याबाबतचे खास सादरीकरण केले गेले. या गाडीचे डबे खास बनवून घेण्यात आले असून त्यात बायो टॉयलेट, रंगीत आसने, पाणी शुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर) आदी सुविधा आहेत. ही गाडी संपूर्णपणे अनारक्षित असेल. याचे तिकीट दर अद्याप जारी झालेले नसले तरी ते सर्वसामान्य गाड्यांपेक्षा 10 ते 15 टक्‍क्‍यांनी जास्त असू शकतात याचे संकेतही प्रभू यांनी दिले आहेत. 2016च्या अर्थसंकल्पातील रेल्वेविषयक तरतुदीत अंत्योदय गाडीचा स्वतंत्र मुद्दा होता.

असे आहेत रेल्वेचे दर
- पाण्याची बाटली (रेल नीर) ः 15 रुपये
- चहा-कॉफी ः 5 व 10 रुपये
- शाकाहारी नाश्‍ता ः 30 रुपये
- सामिष नाश्‍ता ः 35 रुपये
- भोजन अनुक्रमे ः 50 व 55 रुपये

Web Title: Train passengers stop the plunder