बुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या 

पीटीआय
रविवार, 9 डिसेंबर 2018

लखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. 

3 डिसेंबर रोजी बुलंदशहरातील चिंगरावटी भागात उसळलेल्या हिंसाचारात पोलिस अधिकारी सुबोध सिंह आणि सुमीत नावाच्या अन्य एका युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 27 जणांसह 50 ते 60 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पाच आणखी आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंद्र, रोहित, सोनू, नितीन आणि जितेंद्र नावाच्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना पकडण्यात आले आहे.

तसेच बुलंदशहरातील हिंसाचार रोखण्यास अपयश आल्याने अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक एस. बी. शिराडकर आणि मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) सत्यप्रकाश शर्मा आणि चिंगरावटी पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सुरेश कुमार यांच्या अगोदरच बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकाराला दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Transfers of two officers in Bulandshahr case