सेक्ससाठी नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर गोळीबार

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : सेक्ससाठी नकार देणाऱ्या 21 वर्षीय तृतीयपंथीयावर गोळीबार करण्यात आला. लिफ्ट देणाऱ्या दोघांनी तृतीयपंथीयाकडे सेक्सची मागणी केली होती. मात्र, संबंधित तृतीयपंथीयाने सेक्ससाठी नकार दिल्याने तिच्याव गोळीबार करण्यात आला. ही घटना दिल्लीच्या त्रिलोकपुरी येथे घडली.

या दोघांनी संबंधित तृतीयपंथीयाला आपल्या कारमध्ये लिफ्ट दिली होती. त्याचदरम्यान, या दोघांनी तिच्याकडे सेक्सची मागणी केली. जेव्हा त्या तृतीयपंथीयाने सेक्ससाठी नकार दिला तेव्हा तिच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर या दोघांनी धावत्या कारमधून तिला फेकून दिले. यातील दोघांपैकी एकाला पकडण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिस उपायुक्त चिन्मय बिस्वल यांनी सांगितले, की ''जेव्हा आम्ही रुग्णालयात पोचलो, तेव्हा संबंधित तृतीयपंथीयाच्या पोटावर गोळीबार करण्यात आल्याचे दिसले. आम्ही खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे''. 
 
Web Title: Transgender shot and injured for Refusing Sex by 2 men who offered her lift