गोवा - वाहतूक खात्याचे व्यवहार 1 ऑक्‍टोबरपासून "कॅशलेस' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

गोवा : वाहतूक खात्यातील सर्व प्रकारचे व्यवहार येत्या 1 ऑक्‍टोबर 2018 पासून पूर्णपणे रोखमुक्त (कॅशलेस) करण्यात येणार असून रोखीने कोणताच व्यवहार स्वीकारला जाणार नसल्याचे वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या सूचनेत नमूद केले आहे. 

या खात्याने यापूर्वीच 9 एप्रिल 2018 पासून एचडीएफसी व भारतीय स्टेट बॅंक या दोन बॅंकांशी करार केला असून रोखमुक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वाहनासंदर्भातील विविध शुल्क व विविध कराची रक्‍कम रोखमुक्तद्वारे भरण्यास वाहन मालकांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न आहे.

पीओएस वापर करून डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करता येणार आहे. खात्याकडे भरणा करण्याची रक्कम एक हजारपेक्षा अधिक असल्यास ती येत्या 1 जुलैपासून स्वीकारली जाणार नाही. त्यापेक्षा कमी असलेली रक्कम भरणा सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंतच स्वीकारली जाईल तर रोखमुक्त स्वरूपातील व्यवहार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारला जाणार आहे. हा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करणे आवश्‍यक आहे. ज्या व्यक्तींकडे रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी डेबिट वा क्रेडिट कार्ड नाही त्यांना संबंधित उपसंचालकांच्या कार्यालयातून "चलन' घेऊन ती रक्कम खात्याच्या बॅंकेतील अकाऊंटमध्ये भरावी लागणार आहे.

Web Title: transport department do all the transaction cashless in goa