आगामी निवडणुकीत आश्चर्याचे धक्के देऊ: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : भाजपविरोधातील 'महागठबंधन'ला सुरुंग लावणार्‍या मायावती आणि अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'आम्ही पूर्णपणे स्वबळावरच लढू' असे जाहीर केले.

गेली दोन दशके राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा काल (शनिवार) केली. या आघाडीमध्ये दोन्ही पक्षांनी कॉंग्रेसला गृहीत धरले नाही. 

या घोषणेनंतर काही तासांनीच राहुल गांधी यांनी दुबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. 'दोन्ही नेत्यांविषयी मला प्रचंड आदर आहे', असे विधान राहुल यांनी केले. तसेच, 'दोन्ही पक्षांना त्यांना हवे ते करण्याचा अधिकार  आहे', असेही ते म्हणाले.

''बसप आणि सप यांनी त्यांचा राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस बळकट कशी करायची, हे आपल्यालाच ठरवायचे आहे. आगामी निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढू! त्या दोन्ही पक्षांना आघाडी करण्याचा पूर्ण अधिकार आहेच. पण उत्तर प्रदेशच्या जनतेला देण्यासारखे कॉंग्रेसकडे भरपूर काही आहे. आमची विचारसरणी जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने मैदानात उतरू'', असे राहुल म्हणाले.

'आमचा जनाधार काय आहे, हे दाखवून देत लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला एक-दोन आश्चर्याचे धक्के आम्ही नक्कीच देऊ..', असेही राहुल यांनी सांगितले.

'भाजप सत्तेपासून दूर राहत असेल, तर सप-बसपच्या आघाडीबाबत कॉंग्रेसला काहीही अडचण वाटत नाही', अशा शब्दांत राहुल यांनी निवडणुकीनंतरच्या संभाव्य समीकरणांचेही संकेत दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com