#Abdulkalam : 'मिसाईल मॅन' डॉ. कलामांना जन्मदिनानिमित्त अभिवादन

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. म्हणूनच सर्व क्षेत्रातील व्यक्तिंनी आज कलाम यांना सोशल मिडियावरून अभिवादन केले आहे. 

भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करताना 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभर कौतुक झाले. भारताच्या सुरक्षेतील सर्वात महत्त्वाच्या पोखरण अणुचाचणीचे ते जनक होते. अणुचाचणी यशस्वी झाल्याने अण्वस्त्रांसाठी भारताचे जगभर नाव झाले. 

महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती असतानाही कलाम हे लहान-सहान गोष्टीत आनंद शोधत असत. लहान मुलांशी गप्पा मारणे, रूद्रवीणा वाजवणे, भरपूर वाचन हे त्यांचे छंद होते. 2020 रोजी होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न कलाम यांनी पाहिले होते. भारत सरकारने त्यांना सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. म्हणूनच सर्व क्षेत्रातील व्यक्तिंनी आज कलाम यांना सोशल मिडियावरून अभिवादन केले आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribute to APJ Abdul Kalam on his birth anniversary