स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज खरी श्रद्धांजली

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी आज प्रत्येकाच्या मनात आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतीथी आहे..

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी आज प्रत्येकाच्या मनात आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतीथी आहे.. एअरस्ट्राईक करुन भारतीय हवाईदलाने पुलवामा हल्याचा बदला घेतला. तसंच खऱ्या अर्थाने सावरकरांना श्रद्धांजली वाहिली असल्याची भावना सोशल मिडियावर व्यक्त होत आहे.

सावरकरांची राष्ट्रभक्ती, देशाभिमान आज खरा ठरला असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या अनेक कवितांची पदं देखील सोशल मिडियावर आज शेअर होत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribute to Swatantryaveer Savarkar