भाजप व्हायरसविरुद्ध तृणमूलचे सॅनीटायझर; घरवापसीपूर्वी कार्यकर्त्यांवर फवारा

भाजप व्हायरसविरुद्ध तृणमूलचे सॅनीटायझर; घरवापसीपूर्वी कार्यकर्त्यांवर फवारा

बीरभूम : पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वादामध्ये 'न भूतो' अशी घटना घडली आहे. सुमारे दिडशे भाजप कार्यकर्ते स्वगृही परतण्यापूर्वी त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसकडून निर्जंतुकांची फवारणी करण्यात आली. सोशल मिडीयामुळे हा विषय गाजत आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनीच आपल्या शरीरात बीजेपी व्हायरस असल्याचे सांगितले. त्यामुळे ही शुद्धीकरण प्रक्रिया असल्याचे तृणमूलकडून स्पष्ट करण्यात आले. इलमबाजार ब्लॉकमध्ये हा प्रकार घडला. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कार्यकर्ते बाजूने जात असताना स्थानिक नेते त्यांच्यावर निर्जंतुकांची फवारणी करीत होते.

भाजप व्हायरसविरुद्ध तृणमूलचे सॅनीटायझर; घरवापसीपूर्वी कार्यकर्त्यांवर फवारा
लस घ्या आणि जिंका LED टीव्ही-फ्रीज; लसीकरणासाठी हटके उपक्रम

याआधी गंगाजल

याआधी हुगळी जिल्ह्यातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांचे मुंडण करण्यात आले होते. त्याशिवाय त्यांच्यावर गंगाजल शिंपडण्यात आले होते. भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय म्हणजे आपली चूक असल्याचे या कार्यकर्त्यांनी कबूल केले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी स्वतः मुंडण करून घेतल्याचा दावा करण्यात आला. या कार्यकर्त्यांनी हातात तृणमूलचा झेंडा घेतला आणि आरामबागच्या खासदार अपारुपा पोद्दार यांच्याशी हस्तांदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com