esakal | तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेपर्यंत सायकल फेरी
sakal

बोलून बातमी शोधा

Trinamool Congress MP

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेपर्यंत सायकल फेरी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - संसद अधिवेशनाचा (Parliament Session) पहिला दिवस पेगॅसस हेरगिरीसह मराठा आरक्षण, इंधन दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही (Farmer Issue) चर्चेत राहिला. शिवसेनेने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) स्थगन प्रस्ताव (Proposal) दिला होता. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेपर्यंत सायकल फेरी (Cycle Rally) काढून इंधन दरवाढीकडे लक्ष वेधले. (Trinamool Congress MP Cycle Rally to Parliamnet)

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला असताना शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता. अर्थात, गदारोळामुळे लोकसभेमध्ये काहीही कामकाज होऊ शकले नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. दुसरीकडे, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी तृणमूलच्या खासदारांनी सायकलवरून संसद भवनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. खासदार डेरेक ओब्रायन, कल्याण बॅनर्जी, अर्पिता घोष, नदीमुल हक, शंतनू सेन, अबिररंजन बिस्वास यांनी संसद भवनाच्या आवारात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणात देत इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली.

दरम्यान, अकाली दल, बहुजन समाज पक्षाने शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने संसद भवनाच्या आवारात निदर्शने करून केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

loading image