खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल, कारण...

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असताना दुसरीकडे तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात आहेत. शनिवारी त्यांनी नवऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी केली होती. यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना श्वासनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असताना दुसरीकडे तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात आहेत. शनिवारी त्यांनी नवऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी केली होती. यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नुसरत जहाँ यांना कोलकातामधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

रुग्णालयात असल्याने त्या संसदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकल्या नाहीत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच हिंदू तरुणाशी लग्न करत संसदेत हजर झाल्याने त्या चर्चेत आली होती. नुसरत यांना अस्थम्याचा त्रास आहे. या आधीही त्यांना अनेकदा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला होता.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
https://www.esakal.com/mukhya-news
https://www.esakal.com/live-updates/marathi-breaking-news  
https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trinamool MP Nusrat Jahan In Kolkata Hospital Due To Respiratory Problem