esakal | होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स; जाणून घ्या...

बोलून बातमी शोधा

Mask-95
होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स; जाणून घ्या...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. या नव्या गाईडलाइन्सनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांनी कायम ट्रिपल लेअर मेडिकल मास्क वापरण गरजेचं आहे.

नव्या गाईडलाईन्स अशा आहेत

  1. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी कायम ट्रिपल लेअर मेडिकल मास्क वापरणे गरजेचं आहे.

  2. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी प्रत्येक ८ तासांनंतर ट्रिपल लेअर मेडिकल मास्क नष्ट करायचा आहे, त्याचा वापर करु नये.

  3. होम आयसोलेशनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या सेवेसाठी कोणी केअर टेकर रुग्णाच्या खोलीत जाणार असेल तर केअर टेकर आणि रुग्ण दोघांनीही N-95 मास्क लावणं गरजेचं आहे.

  4. रुग्णानं आपला मास्क नष्ट करण्याआधी तो १ टक्के सोडिअम हायपोक्लोराईटने निर्जंतुक करणं गरजेचं आहे.

  5. होम आयसोलेशनमधील रुग्णाने विश्रांती घ्यायला हवी तसेच मोठ्या प्रमाणावर द्रव पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी टिकून राहिलं.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठीच्या या नव्या गाईडलाईन्स केंद्रानं यावेळी आणल्या आहेत जेव्हा देशात २४ तासांतील सर्वाधिक रुग्णांच्या नोंदीचा विक्रम केला आहे.

देशात सकाळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ३,७९,२५७ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोविडच्या रुग्णांची संख्या १,८३,७६,५२४ वर पोहोचली आहे. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येनं ३० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच एकूण बाधित मृतांची संख्या २,०४,८३२ वर पोहोचली आहे तर दिवसभरात ३,६४५ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.